Wednesday, February 7, 2018

मोडी, फारसी व ब्राम्ही प्रशिक्षण

भारत इतिहास संशोधक मंडळ सदाशिव पेठ  येथे मोडी ,फारसी व ब्राम्ही लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोडी लिपीचे वर्ग १६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत संध्याकाळी ६.३० ते .७३० या वेळात असणार आहेत.fees Rs 500

यातील फारसी वर्ग हे प्रगत वर्ग असून ६ मार्च पासून दर मंगळवार व गुरुवार संध्याकाळी ६.१५ ते ७.३०  या वेळेत  असून त्याचा कालावधी  ३ महिने  आहे.  फारसी तज्ञ राजेंद्र जोशी या वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी फारसी येणे आवश्यक आहे.fees Rs 1200

ब्राम्ही लिपीचे वर्ग  रविवारी  ११, १८, २५  मार्च व १ एप्रिल  या दिवशी संध्याकाळी ६.३० ते ८ या वेळात होणार असून ब्राम्ही लिपीचे जाणकार प्रा.डॉ.पद्माकर प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत.fees Rs . 600 आधिक माहितीसाठी 24472581

Wednesday, December 20, 2017

नव्या वर्षात मोडी शिका


मोडी लिपी ही मराठीची प्राचीन लिपी. मराठी साम्राज्याच्या माहितीचा खजिना मोडी लिपीत लिहिलेल्या कागदपत्रांमध्ये, दफ्तरांमध्ये दडलेला आहे. आज कोट्यवधी कागदपत्रे थेट तंजावरपर्यंत मोडी लिप्यंतर करणाऱ्यांची वाट पहात आहेत. ही मोडी लिपी शिकण्याची संधी पुन्हा एकदा भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे आली आहे.
येत्या 1 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत (2018) भारत इतिहास संशोधक मंडळात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ - सायंकाळी 6.30 ते सायंकाळी 7.30
प्रशिक्षणाचे शुल्क - 500 रुपये
अधिक माहितीसाठी - 9823079087 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tuesday, November 7, 2017

मोडी लिपीच्या सरावासाठी मोडी पत्रांचे पुस्तक

सोपी मोडी पत्रे
मोडी लिपीचा सराव हा मोडी लिपीतला मजकूर किंवा कागदपत्रे वाचूनच होतो. असे कागद कुठे मिळणार हा प्रश्न सोडवला आहे पुण्याचे मोडी लिपी तज्ज्ञ मंदार लवाटे व सौ. भास्वती सोमण यांनी. त्यांनी 'सोपी मोडी पत्रे' या पुस्तकात लहान पण अवघड नसलेली ५० पत्रे पुस्तकात दिली असून असून  डाव्या बाजूस मोडी पत्रं व  उजव्या बाजूस त्याचे देवनागरी लिप्यंतर आहे. खाली कठीण शब्दांचे अर्थ आहेत.मोडी शिकणाऱ्यांसाठी उपयुक्त असे हे  पुस्तक आहे. हे पुस्तक बूकगंगावर अत्यल्प किंमतीत उपलब्ध आहे.

हे पुस्तक मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87&BookType=1


Friday, April 28, 2017

मोडी प्रशिक्षण

भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी  प्रशिक्षण वर्ग दिनांक 8 मे ते 25 मे . रोज संध्याकाळी 6.30 ते 7.30 फी: 400 रू..  आधी नोंदणी आवश्यक संपर्क 98230 79087

मोडी हस्ताक्षर स्पर्धा

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे मोडी लिपी हस्ताक्षर व लिप्यांतर स्पर्धा रविवार दिनांक १४ मे २०१७ रोजी आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी ज्यांना स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषीक म्हणुन मानचिन्ह देण्यात येईल. तसेच प्रत्येक  स्पर्धकाला प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
संपर्क - ९६०४०६९८६२

Saturday, December 31, 2016

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री
सर्व मोडी लिपी प्रेमींना
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- मंदार लवाटे-
- अमित गोळवलकर





मोडी लिपी शिकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/user/amitsg1?spfreload=5

Thursday, November 24, 2016

पुण्यात विनामूल्य मोडी प्रशिक्षण वर्ग

श्री
मोडी शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मोडी लिपी शिकण्याची उत्सुकता आहे. पुढील काळात मोडी लिपी येणे हे उत्पन्नाचे साधनही बनू शकते. याच्या काही योजना तयार होत आहेत. मराठी साम्राज्याचा मोडी कागदांमध्ये दडलेला इतिहास समोर यावा यासाठी मोडी लिपी शिकणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारत इतिहास संशोधक मंडळाने विनामूल्य मोडी प्रशिक्षण वर्ग घेण्याची योजना आखली आहे.
२ डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळात सकाळी 10.30 ते 11.30 आणि सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळात हे वर्ग सदाशिव पेठेत भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वास्तूत होणार आहेत. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, यासाठी हे आवाहन.

संपर्कासाठी - 9822251014 किंवा 9823079087 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.

ज्यांना प्रशिक्षण वर्गाला जाता येणार नाही त्यांच्यासाठी युट्यूबवर या लिंकवर मोडी प्रशिक्षण उपलब्ध आहे.
 https://www.youtube.com/user/amitsg1
पुण्याचे मोडी तज्ज्ञ व इतिहास संशोधक मंदार लवाटे युट्यूबच्या माध्यमातून मोडी लिपी शिकवित आहेत.