Wednesday, December 20, 2017

नव्या वर्षात मोडी शिका


मोडी लिपी ही मराठीची प्राचीन लिपी. मराठी साम्राज्याच्या माहितीचा खजिना मोडी लिपीत लिहिलेल्या कागदपत्रांमध्ये, दफ्तरांमध्ये दडलेला आहे. आज कोट्यवधी कागदपत्रे थेट तंजावरपर्यंत मोडी लिप्यंतर करणाऱ्यांची वाट पहात आहेत. ही मोडी लिपी शिकण्याची संधी पुन्हा एकदा भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे आली आहे.
येत्या 1 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत (2018) भारत इतिहास संशोधक मंडळात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ - सायंकाळी 6.30 ते सायंकाळी 7.30
प्रशिक्षणाचे शुल्क - 500 रुपये
अधिक माहितीसाठी - 9823079087 या क्रमांकावर संपर्क साधावा.