Showing posts with label मोडी लिपी. Show all posts
Showing posts with label मोडी लिपी. Show all posts

Friday, April 28, 2017

मोडी हस्ताक्षर स्पर्धा

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे मोडी लिपी हस्ताक्षर व लिप्यांतर स्पर्धा रविवार दिनांक १४ मे २०१७ रोजी आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी ज्यांना स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषीक म्हणुन मानचिन्ह देण्यात येईल. तसेच प्रत्येक  स्पर्धकाला प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
संपर्क - ९६०४०६९८६२

Wednesday, October 26, 2016

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री
आपणा सर्वांना दीपावलीच्या 
हार्दीक शुभेच्छा
ही दीपावली आनंदाची
सुखसमाधानाची जावो
अमित गोळवलकर

Saturday, July 9, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 6 - बाराखडी प ते म


श्री
मोडी लिपीच्या बाराखडीच्या अंतीम टप्प्यांपर्यंत आपण हळूहळू येतोय. त, थ, द, ध, न या नंतरची अक्षरे आहेत प, फ, ब, भ, म. ही अक्षरे मोडी लिपीत कशी लिहिली जातात ये वरील चित्रावरुन आपल्याला समजेल. आता खालील व्हिडिओ आपल्याला या अक्षरांची बाराखडी शिकवेल.


प, फ, ब, भ, म या अक्षरांची बाराखडी सरावासाठी खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्या
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZT0RXVnYtMlE4Qmc/view?usp=sharing

मोडी लिपी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ आपल्याला इथे पाहता येतील -
https://www.youtube.com/user/amitsg1

कृपया या उपक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपल्या प्रतिक्रिया खालील ई-मेलवर पाठवल्यास आम्ही उपकृत राहू
मंदार लवाटे -
lawate@gmail.com

अमित गोळवलकर -
gamits@gmail.com 

Monday, June 27, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 2 - बाराखडी क ते ङ





श्री
मोडी लिपीची माहिती श्री. मंदार लवाटे यांच्याकडून घेतल्यानंतर आता आपण थेट मोडी बाराखडी शिकण्यास सुरुवात करत आहोत. या भागात आम्ही आपल्याला क ते ङ या अक्षरांची बाराखडी शिकवणार आहोत. यापैकी हे अक्षर मोडी लिपीमध्ये येत नाही. त्यामुळे क, ख, ग, घ ही चार अक्षरे श्री. लवाटे आपणास शिकवतील. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/KU7oBcb9TLw

क ते ङ ही अक्षरे पाहून गिरवणे सोपे जावे म्हणून या चार अक्षरांची बाराखडी डाऊनलोड करण्याचीही सोय आम्ही केली आहे. ही सुबक बाराखडी गिरवली आहे पुण्याचे श्री.ओंकार इनामदार यांनी.  ही बाराखडी तुम्हाला खालील लिंकवरुन डाऊनलोड करता येईल -
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_Zc2VKbGU4QnRyYkk/view?usp=sharing

प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

Wednesday, June 22, 2016

मोडी वर्णमाला

मोडी शिकण्यासाठी मराठी बाराखडी आपण पाहिली. या पोस्टमध्ये मोडीची वर्णमाला देत आहोत. येत्या दोन दिवसांत आमचा मोडी अभ्यासक्रमाचा पहिला व्हिडिओ अपलोड करु. पहिल्या भागात आमचे प्रशिक्षक मोडी लिपीविषयी माहिती देतील. दुसऱ्या व्हिडिओपासून आपण प्रत्यक्ष बाराखडी गिरवायला शिकू. मोडी बाराखडीतले प्रत्येक अक्षर कसे लिहायचे, त्या अक्षरांचे वळण कसे असते याची माहिती आपणास या व्हिडिओद्वारे मिळेल. या व्हिडिओबरोबरच शिकवलेल्या अक्षरांसाठी कित्ता देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहोत.
ही वर्णमाला या क्रमाने आहे-

क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट  ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ क्ष ज्ञ
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः

 मोडी वर्णमाला pdf download-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZVFE1ZW1SN0VTVDQ/view?usp=sharing

प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB 

Monday, June 20, 2016

मराठी बाराखडी



मोडी शिकण्यासाठी प्रथम मराठी बाराखडी नीट माहिती असणे आवश्यक आहे.  कारण मोडी ही मराठीचीच लिपी आहे. शालेय जीवनात एकदा बाराखडी शिकलो की मग तिचा आणि आपला थेट संबंध रहात नाही. हे विधान सर्वसाधारण नसले तरीही अऩेकांना मराठीची बाराखडी येत नाही, किंवा कुठल्या क्रमाने अक्षरे येतात हे सांगता येत नाही. त्यामुळे मोडी लिपीची बाराखडी देण्याच्या अगोदरचे एक पाऊल म्हणजे मराठी बाराखडी डोळ्यांसमोर आणणे. मोडी बाराखडी देण्यापूर्वी आम्ही आपणासाठी मराठी बाराखडी देत आहोत.आम्ही मोडी बाराखडी दिली की मग मराठी बाराखडी समोर ठेऊन मोडी बाराखडी लिहिण्याचा सराव करता येईल.
व्यंजने
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
ख खा खि खी खु खू खे खै खो खौ खं खः
ग गा गि गी गु गू गे गै गो गौ गं गः
घ घा घि घी घु घू घे घै घो घौ घं घः
ङ ङा ङि ङी ङु ङू ङे ङै ङो ङौ ङं ङः
च चा चि ची चु चू चे चै चो चौ चं चः
छ छा छि छी छु छू छे छै छो छौ छं छः
ज जा जि जी जु जू जे जै जो जौ जं जः
ञ ञा ञि ञी ञु ञू ञे ञै ञो ञौ ञं ञः
ट टा टि टी टु टू टे टै टो टौ टं टः
ठ ठा ठि ठी ठु ठे ठै ठो ठौ ठं ठः
ड डा डि डी डु डू डे डै डो डौ डं डः
ढ ढा ढि ढी ढु ढू ढे ढै ढो ढौ ढं ढः
ण णा णि णी णु णू णे णै णो णौ णं णः
त ता ति ती तु तू ते तै तो तौ तं तः
थ था थि थी थु थू थे थै थो थौ थं थः
द दा दि दी दु दू दे दै दो दौ दं दः
ध धा धि धी धु धू धे धै धो धौ धं धः
न ना नि नी नु नू ने नै नो नौ नं नः
प पा पि पी पु पू पे पै पो पौ पं पः
फ फा फि फी फु फू फे फै फो फौ फं फः
ब बा बि बी बु बू बे बै बो बौ बं बः
भ भा भि भी भु भू भे भै भो भौ भं भः
म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः
य या यि यी यु यू ये यै यो यौ यं यः
र रा रि री रु रू रे रै रो रौ रं रः
ल ला लि ली लु लू ले लै लो लौ लं लः
व वा वि वी वु वू वे वै वो वौ वं वः
  शा  शि  शी  शु  शू  शे  शै  शो  शौ  शं  शः
  षा  षि  षी  षु  षू  षे  षै  षो  षौ  षं  षः 
  सा  सि  सी  सु  सू  से  सै  सो  सौ  सं  सः
  हा  हि  ही  हु  हू  हे  है  हो  हौ  हं  हः
  ळा  ळि  ळी  ळु  ळू  ळे  ळै  ळो  ळौ  ळं  ळः
क्ष  क्षा  क्षि  क्षी  क्षु  क्षू  क्षे  क्षै  क्षो  क्षौ  क्षं  क्षः
ज्ञ  ज्ञा  ज्ञि  ज्ञी  ज्ञु  ज्ञू  ज्ञे  ज्ञै  ज्ञो  ज्ञौ  ज्ञं  ज्ञः
स्वर
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
या व्यतिरिक्त ऋ आणि लृ ही दोन व्यंजनेही असतात. पण मोडी लिपीत याचा वापर होत नाही.
      ङ व ञ ही दोन व्यंजनेही मोडी लिखाणात आढळत नाहीत
बाराखडी पीडीएफ डाऊनलोड-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZMFdBQWRrYmhVMk0/view?usp=sharing
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB 

Friday, June 17, 2016

इतिहास मोडी लिपीचा भाग- 2




श्री
पहिल्या भागात आपण मोडी लिपीचा संक्षिप्त इतिहास वाचला. आता त्या विषयी आणखी काही....

आधी नमूद केल्याप्रमाणे देवनागरीची लघुलिपी म्हणजे मोडी होय. यादव राज्याचे पंतप्रधान हेमाद्री तथा हेमाडपंथ यांनी या लिपीचा शोध लावला हे बहुश्रुत आहे. पण मोडीच्या उगमाबाबत आणखीही काही मतप्रवाह आहेत. मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाह आहे. 10 व्या शतकात अरबी नस्तलिक मधून शिकस्ता लिपी जन्माला आली. शिकस्ता म्हणजे मोडकी नस्तलीक. त्यामुळे मोडीच्या उगमाचा शिकस्ताशी संबंध नाही असे काही अभ्यासक मानतात. मोडी लिपी श्रीलंकेहून आली असावी असाही एक समज आहे. पण महादेवराव किवा रामदेवराव यादवांच्या काळात त्यांच्या राज्याचा श्रीलंकेशी संबंध आला नव्हता त्यामुळे ही लिपी श्रीलंकेहून आली नाही, असेही सांगितले जाते. 

मोडीच्या शिवपूर्व, शिवकाल, पेशवेकाल व आंग्लकाल या या चारही काळांमध्ये मोडी लिपीची वळणे बदलत गेल्याचे दिसते. शिवपूर्व काळात मोडी अक्षरे एकमेकांच्या अगदी जवळ आणि उभी लिहिली जात. शिवकाळापासून पुढे पेशवेकाळापर्यंत मोडी अधिक सुंदर बनत गेली. त्यावेळी बोरू किंवा टाकाने मोडी लिहिली जाई. पण ब्रिटिशांनी लिखाणासाठी नीबचा वापर सुरु केला. त्यामुळे बोरूने लिहिल्या जाणाऱ्या अक्षरांना असणारी जाडी किंवा रुंदी नीबच्या अक्षरांना येईनाशी झाली. परिणामी ब्रिटिशकालीन मोडी वाचण्यासाठी अधिक किचकट बनली. 

मोडीचा उगम हा जलद लेखनाच्या गरजेतून झाला. बाळबोध लिहितांना काना, मात्रा, वेलांटया, दिर्घ हया करीता खूप वेळ लागतो व लिहिण्याचा वेळ वाढतो म्हणून वेळ वाचविण्याकरिता लिपीची निर्मिती झाली. कागदावर सरळ रेष काढून हात कमीत कमी वेळा उचलून जलद गतीने लिहीण्याची पध्दत हया लिपीने निर्माण केली. त्याकाळी फोटोकाॅपिंग किंवा झेराॅक्स यंत्रे नव्हती. त्यामुळे कागदांच्या नकला करणे अवघड होते. मोडीच्या उगमामुळे कागदांच्या नकलाही जलद होऊ लागल्या.
हा झाला मोडीचा संक्षिप्त इतिहास. 

आता मोडी लिपीची काही वैशिष्ट्ये
-   - मोडीमध्ये मराठीची 48 अक्षरे असतात. त्यात 36 व्यंजने आणि 12 स्वर असतात
-   - मोडी लिहिताना ऱ्हस्व दीर्घ असा भेद नसतो
  - बऱ्याच मोडी अक्षरांचे उकार हे अक्षराच्या पुढे जोडलेले असतात
-   - मोडी लिहिताना कागदावर एक सरळ रेष आखून त्या रेषेवर मजकूर लिहिला जातो
-   - देवनागरी किंवा बाळबोध लिपीमध्ये अक्षरांच्या संचातून शब्द बनतात. प्रत्येक शब्दानंतर थोडी जागा सोडून पुढचा शब्द लिहिला जातो. मोडीमध्ये मात्र अक्षरसंच नसतात. लिखाण अक्षरांना अक्षरे जोडत सलग केले जाते.
-   - मूळ कागदपत्रांमध्ये जोडाक्षरे काही वेळा बाळबोध मध्ये लिहिल्याचे दिसते
 -  - मोडी लिखाणात प्रश्चचिन्ह, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्हे दिसत नाहीत
-   - मोडी लिखाणात शब्द हे सलग लिहिले जातात. त्यामुळे एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द पूर्ण मावत -नसेल तर जेवढी मावतात तेवढी अक्षरे लिहून शब्दातले पुढचे अक्षर पुढच्या ओळीत लिहिले जाते.

पुढच्या भागात : मोडी जाणणे हाक इतिहासाची

ता. क. मोडी लिपी प्रत्यक्ष कधी शिकवणार असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल याची आम्हाला जाणीव आहे. येत्या एक दोन दिवसांमध्येच आम्ही मोडीची बाराखडी आपणास उपलब्ध करुन देऊ. बाराखडी स्पष्ट समजावी यासाठी सुलेखन तज्ज्ञाकडून (Calligrapher) आरेखन करण्याचे काम सुरु आहे.
मित्रांनो, एक विनंती. या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. आपले अनेक मित्र-मैत्रिणी याची वाट पहात असतील.
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB


Thursday, June 16, 2016

इतिहास मोडी लिपीचा भाग-1

                                                                     मोडी पत्राचा नमुना

मोडी लिपी ही मराठी भाषेची लिपी आहे. ही लिपी प्रथम कुणी शोधून काढली याबाबत काही मतप्रवाह असले तरीही देवगिरीचे राजे महादेवराव व रामदेवराव यादव .यांच्या राज्यात पंतप्रधान असलेल्या श्री. हेमाडपंतांनी या लिपीचा शोध लावला असे मानले जाते. यादव राज्याचे दफ्तर हेमाडपंतांकडे असे. देवनागरी लिपीत प्रत्येक अक्षर सुटे असते आणि प्रत्येकवेळी लिहिताना लेखणी उचलावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी हेमाडपंतांनी देवनागरीतली अक्षरे मोडून जलद लिहिण्यासाठी जी लिपी तयार केली ती मोडी लिपी. फारसी भाषेची शिकस्ता नांवाची एक लिपी आहे. त्या लिपीच्या धर्तीवर हेमाडपंतांना मोडीची कल्पना सुचली असावी असे मानले जाते. तेराव्या शतकापासून अगदी 1950 पर्यंत मोडी लिपी प्रचारात होती. 1950 पर्यंत तर महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात या लिपीचा समावेश होता. पण छपाईच्या व अन्य अडचणींमुळे ही लिपी अभ्यासक्रमातून बाद झाली.

मोडी लेखनाचे चार काळ आहेत. पहिला यादवकालीन (ही कागदपत्रे सापडत नाहीत.) म्हणजेच शिवपूर्वकालीन , दुसरा शिवकालीन,  तिसरा पेशवेकालीन आणि चवथा आंग्लकालीन (ब्रिटीशकालीन). पेशव्यांचे सर्व दफ्तर मोडी लिपीतच होते. पुढच्या काळात या लिपीला निरनिराळी वळणे प्राप्त झाली. त्यापैकी चिटणीशी, महादाजीपंतजी, बिवलकरी, रानडी ही काही वळणे. मराठी साम्राज्याचा विस्तार जसा झाला तसतसा हिदुस्थानच्या अन्य प्रदेशांतही मोडीचा प्रसार आपोआप झाला. मद्रास, म्हैसूर इथली सरकारी दफ्तरे याच लिपीत लिहिली जात. कर्नाटकातही सावकरांचे हिशेब कानडी भाषेत पण मोडी लिपीत लिहिले जात असा उल्लेख सापडतो. इंग्रजांनीही ही लिपी वापरात ठेवली होती. इंग्रज अधिकाऱ्यांची अनेक फर्माने किंवा आदेश मोडी भाषेत असल्याचे ऐतिहासिक दफ्तरांतून दिसते.
मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.

आपल्यालाही ही मोडी लिपी शिकायची आहे. इथे कुठली परिक्षा नाही, कुठल्या चाचण्या नाहीत. स्वान्तसुखाय म्हणजेच स्वतःच्या आनंदासाठी आपल्याला मोडी लिपी शिकायची आहे. पुढच्या भागात आणखी थोडा इतिहास आपण जाणून घेऊ.

(क्रमशः)
लेखन संदर्भ - पं. महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृतीकोश
 प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

Wednesday, June 15, 2016

अशी असेल मोडी शिकवण्याची पद्धत

श्री
नमस्कार,
आमच्या पहिल्या पोस्टला दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण दाखवलेला उत्साह हा आमचा उत्साह वाढवणार आहे. या ब्लाॅगद्वारे मोडी कशी शिकणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निश्चित आला असेल. पण मी आणि माझ्यासारखे अनेक जण ज्या पद्धतीने मोडी लिपी शिकले, नेमकी तीच पद्धत आम्ही इथे वापरणार आहोत.
या नंतरच्या एक-दोन पोस्टमध्ये मोडी लिपीचा इतिहास, त्याचा वापर, मोडी लेखनाचे विविध काळ, याची माहिती असेल. लगेचच आम्ही मराठी आणि मोडीची बाराखडी या ब्लाॅगवर अपडेट करु. या दोन्ही बाराखड्या डाऊनलोड करुन तुम्हाला हाताशी ठेवता येतील. या टप्प्यानंतर दृकश्राव्य (Audio Visual) स्वरुपात प्रत्यक्ष बाराखडी कशी काढावी हे दाखवले जाईल. याचे सर्वसाधारण पाच भाग असतील. ही बाराखडी कोण शिकवणार हे तूर्तास सांगत नाही. पण जे मान्यवर ही बाराखडी शिकवणार आहेत, त्यांचा या क्षेत्रातला अनुभव मोठा आहे, एवढेच आत्ता सांगतो. ज्यांना मराठी बाराखडीची ओळख, उजळणी करायची आहे, त्यांनाही याचा उपयोग निश्चित होईल.
मोडी लेखनाचा महत्त्वाचा भा्ग असलेली कालगणना आणि रेघी हिशेब याचीही सविस्तर माहिती ब्लाॅगद्वारे दिली जाईल.  ती लिखित स्वरुपात आणि दृकश्राव्य स्वरुपातही असेल.
पुढे सरावासाठी काही पाठ आम्ही अपडेट करु. त्यात सरावासाठी कुठली पुस्तके वाचायची, ती कोठून मागवायची याची माहिती आणि लिंक्स आम्ही देऊ. आमचे ई-मेलही आम्ही शेअर करणार असून सरावासाठी तुम्ही केलेले लेेखन तुम्ही आम्हाला स्कॅन करुन पाठवू शकता. पुढच्या टप्प्यात ब्लाॅगच्या माध्यमातून सोपी ऐतिहासिक मोडी कागदपत्रे सरावासाठी उपलब्ध करुन दिली जातील. त्याचबरोबर काही संस्थांच्या वेब-साईटच्या लिंक्सही आम्ही देणार आहोत. या संस्थांच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला मोडी कागदपत्रे वाचायला मिळतीलच शिवाय काही ऐतिहासिक महत्त्वाची पुस्तकेही पीडीएफ (PDF) तुम्ही वाचू शकाल.
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
चला तर मग...भेटूया नव्या पोस्टसह..
ता. क. - खाली दिलेला लेखन सीमा असे लिहिलेला शिक्का हा मोडी कागदपत्रात लिखित मजकुराच्या शेवटी आढळतो. मजकुराचे किंवा पत्राचे लेखन संपल्याचे दर्शविणारा हा शिक्का आहे.


Monday, June 13, 2016

लवकरच येत आहे.......


 श्री गणेशायनम:
 नमस्कार
मित्रांनो, गेल्या वर्षी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात भाग घेतला आणि आमचे मित्र श्री. मंदार लवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोडी लिपी शिकलो. लगेचच महाराष्ट्र राज्याच्या पुराभिलेख संचनालयाच्या वतीने मोडी अभ्यासक्रम सुरु झाला आणि आधी शिकल्याने शासनाची परिक्षाही उत्तीर्ण झालो. सध्या जमेल तसा मोडी वाचनाचा सराव करतो आहे. मोडी कागदपत्रांतली अक्षररुपी कोडी सोडवण्याची मौज काही वेगऴीच आहे.
मात्र, अनेकांना इच्छा असूनही वेळेअभावी मोडी लिपी शिकणे शक्य होत नाही. काही ठिकाणी मोडी शिकण्याची सोयच नाही. विशेषतः परदेशात  राहणाऱे आमचे बांधव यापासून कित्येक कोस दूर आहेत. महाराष्ट्रातही बहुसंख्य ठिकाणी मोडी शिकण्याची सोय नाही. त्यामुळे कोट्यवधी मोडी कागद अद्याप वाचायचे राहिले आहेत. मी स्वतः मोडीचा तज्ज्ञ नाही. मोडी लिपी मला येते एवढेच. पण तरीही ही लिपी अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा प्रपंच करत आहोत.
ही लिपी कोण शिकवणार, कशी शिकवणार, त्याचा सराव कसा करायचा, सरावासाठी कागद कसे उपलब्ध होणार, या साऱ्यांची उत्तरे हळूहळू आम्ही या ब्लाॅगच्या माध्यमातून देऊच. थेट तुमच्या पर्यंत मोडी लिपीचा वर्ग आणण्यासाठी आम्ही काम सुरु केले आहे. लवकरच त्यासह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तूर्त प्रतिसाद जाणून घेण्यासाठी ही पहिली पोस्ट......
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पहा-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB