Showing posts with label mandar lavate. Show all posts
Showing posts with label mandar lavate. Show all posts

Wednesday, February 7, 2018

मोडी, फारसी व ब्राम्ही प्रशिक्षण

भारत इतिहास संशोधक मंडळ सदाशिव पेठ  येथे मोडी ,फारसी व ब्राम्ही लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोडी लिपीचे वर्ग १६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत संध्याकाळी ६.३० ते .७३० या वेळात असणार आहेत.fees Rs 500

यातील फारसी वर्ग हे प्रगत वर्ग असून ६ मार्च पासून दर मंगळवार व गुरुवार संध्याकाळी ६.१५ ते ७.३०  या वेळेत  असून त्याचा कालावधी  ३ महिने  आहे.  फारसी तज्ञ राजेंद्र जोशी या वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी फारसी येणे आवश्यक आहे.fees Rs 1200

ब्राम्ही लिपीचे वर्ग  रविवारी  ११, १८, २५  मार्च व १ एप्रिल  या दिवशी संध्याकाळी ६.३० ते ८ या वेळात होणार असून ब्राम्ही लिपीचे जाणकार प्रा.डॉ.पद्माकर प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत.fees Rs . 600 आधिक माहितीसाठी 24472581

Wednesday, December 20, 2017

नव्या वर्षात मोडी शिका


मोडी लिपी ही मराठीची प्राचीन लिपी. मराठी साम्राज्याच्या माहितीचा खजिना मोडी लिपीत लिहिलेल्या कागदपत्रांमध्ये, दफ्तरांमध्ये दडलेला आहे. आज कोट्यवधी कागदपत्रे थेट तंजावरपर्यंत मोडी लिप्यंतर करणाऱ्यांची वाट पहात आहेत. ही मोडी लिपी शिकण्याची संधी पुन्हा एकदा भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे आली आहे.
येत्या 1 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत (2018) भारत इतिहास संशोधक मंडळात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ - सायंकाळी 6.30 ते सायंकाळी 7.30
प्रशिक्षणाचे शुल्क - 500 रुपये
अधिक माहितीसाठी - 9823079087 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Friday, April 28, 2017

मोडी प्रशिक्षण

भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी  प्रशिक्षण वर्ग दिनांक 8 मे ते 25 मे . रोज संध्याकाळी 6.30 ते 7.30 फी: 400 रू..  आधी नोंदणी आवश्यक संपर्क 98230 79087

मोडी हस्ताक्षर स्पर्धा

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे मोडी लिपी हस्ताक्षर व लिप्यांतर स्पर्धा रविवार दिनांक १४ मे २०१७ रोजी आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी ज्यांना स्पर्धेत सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषीक म्हणुन मानचिन्ह देण्यात येईल. तसेच प्रत्येक  स्पर्धकाला प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
संपर्क - ९६०४०६९८६२