आपण या ब्लाॅगद्वारे मोडीचे प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोच आहोत. त्यासाठी युट्यूबचीही मदत घेतो आहोत. पुणे आणि परिसरात राहणाऱ्यांसाठी भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे मोडी लिपी शिकण्याची संधी आली आहे. सदाशिव पेठेत भारत इतिहास संशोधक मंडळात 30 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर या दरम्यान संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळात हे वर्ग असतील. मोडी तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे हे मोडी लिपी शिकविणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना मंडळाच्या वतीने प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
मोडी लिपी प्रशिक्षणासाठी संपर्क भारत इतिहास संशोधक मंडळ फोन- 020-24472581 वेळ सकाळी 8 ते 11, दुपारी 4 ते रात्री 8 (गुरुवारी सुट्टी)
मोडी लिपी प्रशिक्षणासाठी संपर्क भारत इतिहास संशोधक मंडळ फोन- 020-24472581 वेळ सकाळी 8 ते 11, दुपारी 4 ते रात्री 8 (गुरुवारी सुट्टी)