Wednesday, June 29, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 3- बाराखडी च ते ञश्री
धीच्या भागात आपण मोडी लिपीची क ते ङ या अक्षरांची बाराखडी शिकलो. आता या भागात आपण ते या अक्षरांची बाराखडी शिकणार आहोत. मोडी लिपीमध्ये लिहिलेल्या कागदपत्रांमध्ये हे अक्षर दिसत नाही. त्यामुळे या अक्षराच्या बाराखडीचा सराव करण्याची गरज नाही. केवळ मराठी वर्णमालेचा एक भाग म्हणून या पाठात या अक्षराची बाराखडी दिली आहे. ही बाराखडी आपल्याला खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घेता येईल.
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZYmZfeWxqbUdfY2s/view?usp=sharing
आधीच्या पाठात दिलेल्या क ते ग या बाराखडीचा सराव सुरु ठेवा. रोज किमान पाच वेळा ही बाराखडी लिहिलीत तर ती लवकर आत्मसात होईल. चला तर मग आता शिकूया बाराखडीचा पुढचा भाग च ते ञ -


प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येतील -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

Monday, June 27, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 2 - बाराखडी क ते ङ

श्री
मोडी लिपीची माहिती श्री. मंदार लवाटे यांच्याकडून घेतल्यानंतर आता आपण थेट मोडी बाराखडी शिकण्यास सुरुवात करत आहोत. या भागात आम्ही आपल्याला क ते ङ या अक्षरांची बाराखडी शिकवणार आहोत. यापैकी हे अक्षर मोडी लिपीमध्ये येत नाही. त्यामुळे क, ख, ग, घ ही चार अक्षरे श्री. लवाटे आपणास शिकवतील. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/KU7oBcb9TLw

क ते ङ ही अक्षरे पाहून गिरवणे सोपे जावे म्हणून या चार अक्षरांची बाराखडी डाऊनलोड करण्याचीही सोय आम्ही केली आहे. ही सुबक बाराखडी गिरवली आहे पुण्याचे श्री.ओंकार इनामदार यांनी.  ही बाराखडी तुम्हाला खालील लिंकवरुन डाऊनलोड करता येईल -
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_Zc2VKbGU4QnRyYkk/view?usp=sharing

प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

Saturday, June 25, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण- भाग 1

श्री

मोडी लिपी शिकण्याच्या प्रक्रियेतल्या पुढच्या टप्प्यावर आपण जात आहोत. आधी सांगितल्यानुसार आता हे प्रशिक्षण कोण देणार हे स्पष्ट करतो. पुण्यातले इतिहासाचे अभ्यासक आणि मोडीचे तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे आपणास मोडी लिपी शिकवणार आहेत. श्री. लवाटे दशकाहून अधिक वर्षे मोडी लिपीचा अभ्यास करत आहेत. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात श्री. लवाटे मोडी कागदांचा अभ्यास करतात. पुण्याचा इतिहास,  पुण्याच्या गणेशोत्सवाचा इतिहास याचा श्री. लवाटे यांचा मोठा अभ्यास आहे. आता खालील व्हिडिओमध्ये आपण श्री. मंदार लवाटे यांच्याकडून मोडी लिपीची माहिती, ती शिकण्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत....
प्रशिक्षणाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- 


प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ  पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/user/amitsg1मंदार लवाटे, मोडी तज्ज्ञ
श्री. मंदार लवाटे १९९९ पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी कागदपत्रांवर संशोधन करीत आहेत. श्री. लवाटे यांनी २००३ साली महाराष्ट्र शासनाच्या वर्गात मोडीचे शिक्षण घेतले. पुढे ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी त्यांना मोडीतील खाचाखोचा व उर्दू  शिकविले .२००८, मे  पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ी. लवाटे यांनी मोडीचे अध्यापन वर्ग सुरु केले. त्यांनी आता पर्यंत मोडी लिपीचे ३७ वर्ग(batches) घेतले आहेत. महाराष्ट्र पुराभिलेखागर पुणे ( पेशवे दफ्तर ) व भारत इतिहास संशोधक मंडळ येथील अनेक अप्रकाशित कागद त्यांनी उजेडात आणले.  दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आदी वृत्तपत्रात २००० सालापासून आजपर्यंत इतिहास, संस्कृती या विषयावरचे ४०० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. श्री. लवाटे यांनी लिहिलेली पुण्यातील गणपती मंदिर, पुणे कृष्णधवल ,पुण्यातील गणेश विसर्जन-उत्सव १२१ वर्षाचा, सोपी मोडी पत्रे ही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. श्री. लवाटे यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळून उर्वरित वेळ ते इतिहासाचे संशोधन आणि मोडी लिपीच्या प्रसाराचे कार्य करतात.

Wednesday, June 22, 2016

मोडी वर्णमाला

मोडी शिकण्यासाठी मराठी बाराखडी आपण पाहिली. या पोस्टमध्ये मोडीची वर्णमाला देत आहोत. येत्या दोन दिवसांत आमचा मोडी अभ्यासक्रमाचा पहिला व्हिडिओ अपलोड करु. पहिल्या भागात आमचे प्रशिक्षक मोडी लिपीविषयी माहिती देतील. दुसऱ्या व्हिडिओपासून आपण प्रत्यक्ष बाराखडी गिरवायला शिकू. मोडी बाराखडीतले प्रत्येक अक्षर कसे लिहायचे, त्या अक्षरांचे वळण कसे असते याची माहिती आपणास या व्हिडिओद्वारे मिळेल. या व्हिडिओबरोबरच शिकवलेल्या अक्षरांसाठी कित्ता देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहोत.
ही वर्णमाला या क्रमाने आहे-

क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट  ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ क्ष ज्ञ
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः

 मोडी वर्णमाला pdf download-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZVFE1ZW1SN0VTVDQ/view?usp=sharing

प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB 

Monday, June 20, 2016

मराठी बाराखडीमोडी शिकण्यासाठी प्रथम मराठी बाराखडी नीट माहिती असणे आवश्यक आहे.  कारण मोडी ही मराठीचीच लिपी आहे. शालेय जीवनात एकदा बाराखडी शिकलो की मग तिचा आणि आपला थेट संबंध रहात नाही. हे विधान सर्वसाधारण नसले तरीही अऩेकांना मराठीची बाराखडी येत नाही, किंवा कुठल्या क्रमाने अक्षरे येतात हे सांगता येत नाही. त्यामुळे मोडी लिपीची बाराखडी देण्याच्या अगोदरचे एक पाऊल म्हणजे मराठी बाराखडी डोळ्यांसमोर आणणे. मोडी बाराखडी देण्यापूर्वी आम्ही आपणासाठी मराठी बाराखडी देत आहोत.आम्ही मोडी बाराखडी दिली की मग मराठी बाराखडी समोर ठेऊन मोडी बाराखडी लिहिण्याचा सराव करता येईल.
व्यंजने
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
ख खा खि खी खु खू खे खै खो खौ खं खः
ग गा गि गी गु गू गे गै गो गौ गं गः
घ घा घि घी घु घू घे घै घो घौ घं घः
ङ ङा ङि ङी ङु ङू ङे ङै ङो ङौ ङं ङः
च चा चि ची चु चू चे चै चो चौ चं चः
छ छा छि छी छु छू छे छै छो छौ छं छः
ज जा जि जी जु जू जे जै जो जौ जं जः
ञ ञा ञि ञी ञु ञू ञे ञै ञो ञौ ञं ञः
ट टा टि टी टु टू टे टै टो टौ टं टः
ठ ठा ठि ठी ठु ठे ठै ठो ठौ ठं ठः
ड डा डि डी डु डू डे डै डो डौ डं डः
ढ ढा ढि ढी ढु ढू ढे ढै ढो ढौ ढं ढः
ण णा णि णी णु णू णे णै णो णौ णं णः
त ता ति ती तु तू ते तै तो तौ तं तः
थ था थि थी थु थू थे थै थो थौ थं थः
द दा दि दी दु दू दे दै दो दौ दं दः
ध धा धि धी धु धू धे धै धो धौ धं धः
न ना नि नी नु नू ने नै नो नौ नं नः
प पा पि पी पु पू पे पै पो पौ पं पः
फ फा फि फी फु फू फे फै फो फौ फं फः
ब बा बि बी बु बू बे बै बो बौ बं बः
भ भा भि भी भु भू भे भै भो भौ भं भः
म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः
य या यि यी यु यू ये यै यो यौ यं यः
र रा रि री रु रू रे रै रो रौ रं रः
ल ला लि ली लु लू ले लै लो लौ लं लः
व वा वि वी वु वू वे वै वो वौ वं वः
  शा  शि  शी  शु  शू  शे  शै  शो  शौ  शं  शः
  षा  षि  षी  षु  षू  षे  षै  षो  षौ  षं  षः 
  सा  सि  सी  सु  सू  से  सै  सो  सौ  सं  सः
  हा  हि  ही  हु  हू  हे  है  हो  हौ  हं  हः
  ळा  ळि  ळी  ळु  ळू  ळे  ळै  ळो  ळौ  ळं  ळः
क्ष  क्षा  क्षि  क्षी  क्षु  क्षू  क्षे  क्षै  क्षो  क्षौ  क्षं  क्षः
ज्ञ  ज्ञा  ज्ञि  ज्ञी  ज्ञु  ज्ञू  ज्ञे  ज्ञै  ज्ञो  ज्ञौ  ज्ञं  ज्ञः
स्वर
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
या व्यतिरिक्त ऋ आणि लृ ही दोन व्यंजनेही असतात. पण मोडी लिपीत याचा वापर होत नाही.
      ङ व ञ ही दोन व्यंजनेही मोडी लिखाणात आढळत नाहीत
बाराखडी पीडीएफ डाऊनलोड-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZMFdBQWRrYmhVMk0/view?usp=sharing
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB 

Saturday, June 18, 2016

मोडी का शिकायची?

वापरात नसलेल्या मोडी लिपीचा अभ्यास आज का करायचा किंवा आज ही लिपी का शिकायची असा प्रश्न कदाचित कुणाला पडेलही. पण आजच्या महाराष्ट्राच्या इतिहासाची सुुवर्णपाने याच मोडी लिपीत लिहीली आहेत हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. 12 व्या शतकापासून सुरु झालेली मोडी लिपी 1950 पर्यंत व्यवहारात होती. नंतर उरले ते मोडी दस्तऐवज. शिवशाहीतल्या आणि पेशवेकाळातल्या कागदपत्रांपैकी बहुसंख्य कागद हे याच मोडी लिपीत लिहिलेले आहेत. नाना फडणवीसांच्या काळात तर सुरेख मोडी अक्षर असलेल्यांना खास दफ्तरात नोकरी दिली जात असे. आजहीू मोडी वाचू शकणाऱ्यांना त्यातून अर्थार्जनाची संधी मिळू शकते.

आज या साऱ्या कागदपत्रांचा खजिना विविध संस्था, सरकारी कचेऱ्यांमध्ये रुमालांमध्ये बंद आहे. हा खजिना मोडी लिपी वाचू शकणाऱ्यांची प्रतिक्षा करतो आहे. मोडी लिपी का शिकायची यासाठी उदाहरणादाखल काही लिंक्स खाली देत आहे. त्या जरुर वाचाव्यात ही विनंती.
(सोमवारी याच ब्लाॅगवर मराठी बाराखडी देत आहोत. मोडी शिकण्यापूर्वी मराठी बाराखडी जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणानंतर अनेकजण बाराखडी विसरलेले असतात असा अऩुभव आहे. त्यामुळे या निमित्ताने या बाराखडीची उजळणीही होईल)

कृपया खालील लिंक्स जरुर पहा

www.esakal.com/esakal/20100517/5177515027846289957.htm

www.esakal.com/Tiny.aspx?K=W8C2K
मोडी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

Friday, June 17, 2016

इतिहास मोडी लिपीचा भाग- 2
श्री
पहिल्या भागात आपण मोडी लिपीचा संक्षिप्त इतिहास वाचला. आता त्या विषयी आणखी काही....

आधी नमूद केल्याप्रमाणे देवनागरीची लघुलिपी म्हणजे मोडी होय. यादव राज्याचे पंतप्रधान हेमाद्री तथा हेमाडपंथ यांनी या लिपीचा शोध लावला हे बहुश्रुत आहे. पण मोडीच्या उगमाबाबत आणखीही काही मतप्रवाह आहेत. मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाह आहे. 10 व्या शतकात अरबी नस्तलिक मधून शिकस्ता लिपी जन्माला आली. शिकस्ता म्हणजे मोडकी नस्तलीक. त्यामुळे मोडीच्या उगमाचा शिकस्ताशी संबंध नाही असे काही अभ्यासक मानतात. मोडी लिपी श्रीलंकेहून आली असावी असाही एक समज आहे. पण महादेवराव किवा रामदेवराव यादवांच्या काळात त्यांच्या राज्याचा श्रीलंकेशी संबंध आला नव्हता त्यामुळे ही लिपी श्रीलंकेहून आली नाही, असेही सांगितले जाते. 

मोडीच्या शिवपूर्व, शिवकाल, पेशवेकाल व आंग्लकाल या या चारही काळांमध्ये मोडी लिपीची वळणे बदलत गेल्याचे दिसते. शिवपूर्व काळात मोडी अक्षरे एकमेकांच्या अगदी जवळ आणि उभी लिहिली जात. शिवकाळापासून पुढे पेशवेकाळापर्यंत मोडी अधिक सुंदर बनत गेली. त्यावेळी बोरू किंवा टाकाने मोडी लिहिली जाई. पण ब्रिटिशांनी लिखाणासाठी नीबचा वापर सुरु केला. त्यामुळे बोरूने लिहिल्या जाणाऱ्या अक्षरांना असणारी जाडी किंवा रुंदी नीबच्या अक्षरांना येईनाशी झाली. परिणामी ब्रिटिशकालीन मोडी वाचण्यासाठी अधिक किचकट बनली. 

मोडीचा उगम हा जलद लेखनाच्या गरजेतून झाला. बाळबोध लिहितांना काना, मात्रा, वेलांटया, दिर्घ हया करीता खूप वेळ लागतो व लिहिण्याचा वेळ वाढतो म्हणून वेळ वाचविण्याकरिता लिपीची निर्मिती झाली. कागदावर सरळ रेष काढून हात कमीत कमी वेळा उचलून जलद गतीने लिहीण्याची पध्दत हया लिपीने निर्माण केली. त्याकाळी फोटोकाॅपिंग किंवा झेराॅक्स यंत्रे नव्हती. त्यामुळे कागदांच्या नकला करणे अवघड होते. मोडीच्या उगमामुळे कागदांच्या नकलाही जलद होऊ लागल्या.
हा झाला मोडीचा संक्षिप्त इतिहास. 

आता मोडी लिपीची काही वैशिष्ट्ये
-   - मोडीमध्ये मराठीची 48 अक्षरे असतात. त्यात 36 व्यंजने आणि 12 स्वर असतात
-   - मोडी लिहिताना ऱ्हस्व दीर्घ असा भेद नसतो
  - बऱ्याच मोडी अक्षरांचे उकार हे अक्षराच्या पुढे जोडलेले असतात
-   - मोडी लिहिताना कागदावर एक सरळ रेष आखून त्या रेषेवर मजकूर लिहिला जातो
-   - देवनागरी किंवा बाळबोध लिपीमध्ये अक्षरांच्या संचातून शब्द बनतात. प्रत्येक शब्दानंतर थोडी जागा सोडून पुढचा शब्द लिहिला जातो. मोडीमध्ये मात्र अक्षरसंच नसतात. लिखाण अक्षरांना अक्षरे जोडत सलग केले जाते.
-   - मूळ कागदपत्रांमध्ये जोडाक्षरे काही वेळा बाळबोध मध्ये लिहिल्याचे दिसते
 -  - मोडी लिखाणात प्रश्चचिन्ह, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्हे दिसत नाहीत
-   - मोडी लिखाणात शब्द हे सलग लिहिले जातात. त्यामुळे एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द पूर्ण मावत -नसेल तर जेवढी मावतात तेवढी अक्षरे लिहून शब्दातले पुढचे अक्षर पुढच्या ओळीत लिहिले जाते.

पुढच्या भागात : मोडी जाणणे हाक इतिहासाची

ता. क. मोडी लिपी प्रत्यक्ष कधी शिकवणार असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल याची आम्हाला जाणीव आहे. येत्या एक दोन दिवसांमध्येच आम्ही मोडीची बाराखडी आपणास उपलब्ध करुन देऊ. बाराखडी स्पष्ट समजावी यासाठी सुलेखन तज्ज्ञाकडून (Calligrapher) आरेखन करण्याचे काम सुरु आहे.
मित्रांनो, एक विनंती. या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. आपले अनेक मित्र-मैत्रिणी याची वाट पहात असतील.
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB