Monday, July 25, 2016

मोडी सोपे शब्द भाग 2

श्री
मोडी लिपीचे सोपे शब्द आपण शिकायला सुरुवात केली आहे. या आधीच्या पोस्टमध्ये दोन अक्षरी शब्द दिले होते. आता तीन अक्षरी शब्द सरावासाठी देत आहे.
ही फाईल खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घेता येईल.
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZX1B3Z3poVk8xYWs/view?usp=sharing

Sunday, July 24, 2016

पैठणी आता चक्क पुण्यात - Paithani Weaving Started in Pune


पैठणी ही महिलांच्या वस्त्रांची महाराणी. पैठण, येवला ही पैठणी उत्पादनाची पारंपरिक ठिकाणं. पण आता या पैठणीचं उत्पादन चक्क पुण्यात सुरु झालंय. पुण्याच्या एका हरहुन्नरी उद्योजिकेने गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील एका इमारतीत चक्क दोन हातमाग उभे करुन पैठणी विणून देण्याचा व्यवसाय सुरु केलाय. युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मोडी लिपी शिकवितानाच मी आणि मंदार लवाटे आपणाला मराठी संस्कृती, इतिहास, परंपरा यांचाही परिचय करुन देणार आहोत.......

Saturday, July 23, 2016

सरावासाठी सोपी अक्षरे

श्री
मोडी लिपीच्या व्यंजनांची बाराखडी शिकून झाल्यानंतर स्वर शिकण्यापूर्वी तुम्हाला आधी झालेल्या बाराखडीचा सराव करता यावा यासाठी काही सोपी अक्षरे डाऊनलोड फाईलमध्ये दिली आहेत. मोडी बाराखडीच्या सरावाचे व्हिडिअो आणि यापूर्वीच्या पोस्टमध्ये दिलेली संपूर्ण बाराखडी यांचा आधार घेऊन आपण ही अक्षरे वाचण्याचा सराव करा. त्यामुळे मोडी अक्षरे कशी दिसतात हे तुम्हाला समजेल.
ही फाईल खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घेता येईल
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZZDhEbFNHLXdwZUk/view?usp=sharing

प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
 https://www.youtube.com/channel/UCBA_F-UIqMsp__bd2DLE_Tg

या युट्यूब लिंकवर क्लिक करा 

Monday, July 18, 2016

मोडी लिपी बाराखडी संपूर्ण

श्री
मोडी लिपीची क ते ज्ञ या अक्षरांची बाराखडी  या ब्लाॅगद्वारे आणि युट्यूबच्या पाठांद्वारे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मोडीची बाराखडी आतापर्यंत तुकड्यातुकड्यांमध्ये आपणाला डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहेच. संपूर्ण बाराखडी आपल्या संग्रही असावी यासाठी ही बाराखडी आता डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर दिली आहे. आपले प्रशिक्षण श्री. मंदार लवाटे यांनी पुण्याचे एक चित्रकार-कलावंत श्री. ओंकार इनामदार यांच्याकडून ही सुबक बाराखडी खास आपल्यासाठी काढून घेतली आहे. ही बाराखडी समोर ठेऊन आपल्याला मोडी अक्षरांचा सराव करता येईल.
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZQm5CQ2J0WGJPUlE/view?usp=sharing

या मोडी अक्षरांची वळणे कशी आहेत हे मंदार लवाटे युट्यूबच्या माध्यमातून शिकवत आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या आॅनलाईन प्रशिक्षण वर्गाला जरुर भेट द्या.

https://www.youtube.com/user/amitsg1

मोडी स्वर आणि मोडी लिपीतली समान दिसणारी अक्षरे याचा पाठ आम्ही युट्युबर लवकरच अपलोड करत आहोत.  त्यासाठी या ब्लाॅगला आणि युट्यूबवरच्या प्रशिक्षण वर्गाला आवर्जून भेट द्या. आपल्या प्रतिक्रीयाही आम्हाला हव्या आहेत. त्याही खालील ई-मेलवर जरुर पाठवा
gamits@gmail.com

Wednesday, July 13, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 8 - बाराखडी स ते ज्ञ


श्री
मोडी लिपीच्या व्यंजनांचा शेवटचा टप्पा आता आपण पाहणार आहोत. मोडी तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे या भागात आपल्याला स, ह, ळ, क्ष आणि ज्ञ ही व्यंजने शिकविणार आहेत. या आधीच्या भागात दिलेल्या व्यंजनांचा सराव आपण करत असालच. या भागामुळे आता सर्व व्यंजने पूर्ण होतील. पुढील भागात आपण सारखी अक्षरे आणि स्वर शिकणार आहोत. त्यानंतर जोडाक्षरेही शिकू. स त ज्ञ ही बाराखडी खालील लिंकवरुन आपण डाऊनलोड करु शकाल

स ते ज्ञ ही मोडी लिपी व्यंजने कशी लिहिली जातात हे खालील व्हिडिओवरुन आपण शिकू शकता

या प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ आपल्याला खालील लिंकवर मिळतील
https://www.youtube.com/user/amitsg1

Monday, July 11, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग- 7- बाराखडी य ते ष


श्री
मोडी लिपीच्या बाराखडीचा पुढचा भाग युट्यूबवर अपलोड केला आहे. या भागात मोडी तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे आपल्याला य, र, ल,व, श आणि ष या अक्षरांची बाराखडी शिकवतील. यापैकी श आणि ष या दोन अक्षरांच्या मोडी बाराखडीत आणि मराठी बाळबोधच्या बाराखडीत फारसा फरक नाही. ही बाराखडी आपल्याला खालील लिंकवरुन डाऊनलोड करता येईल
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZamZKWVFVcUVVdzA/view?usp=sharing

या बाराखडीचे व्हिडिओ प्रशिक्षण -


मोडी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ आपल्याला खालील लिंकवर मिळतील -
https://www.youtube.com/user/amitsg1

Saturday, July 9, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 6 - बाराखडी प ते म


श्री
मोडी लिपीच्या बाराखडीच्या अंतीम टप्प्यांपर्यंत आपण हळूहळू येतोय. त, थ, द, ध, न या नंतरची अक्षरे आहेत प, फ, ब, भ, म. ही अक्षरे मोडी लिपीत कशी लिहिली जातात ये वरील चित्रावरुन आपल्याला समजेल. आता खालील व्हिडिओ आपल्याला या अक्षरांची बाराखडी शिकवेल.


प, फ, ब, भ, म या अक्षरांची बाराखडी सरावासाठी खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्या
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZT0RXVnYtMlE4Qmc/view?usp=sharing

मोडी लिपी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ आपल्याला इथे पाहता येतील -
https://www.youtube.com/user/amitsg1

कृपया या उपक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपल्या प्रतिक्रिया खालील ई-मेलवर पाठवल्यास आम्ही उपकृत राहू
मंदार लवाटे -
lawate@gmail.com

अमित गोळवलकर -
gamits@gmail.com 

Wednesday, July 6, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 5 - बाराखडी त ते न


मोडी लिपीच्या बाराखडीतला पुढचा भाग आहे ते . यापैकी त ची बाराखडी ही बरीचशी बाळबोध किंवा देवनागरी सारखी असली तरी त चा उकार मात्र वेगळा आहे. आधी शिकवलेली क ते ण पर्यंतच्या बाराखडीचा सराव तुम्ही करतच असाल. बाराखडीचा सराव जितका जास्त कराल तशी मोडी लिपी शिकणे तुम्हाला सोपे जाईल. दिवसातून किमान पाच वेळा बाराखडी गिरवण्याचा सराव करा.
त थ द ध आणि  ची बाराखडी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा- 

त ते न ची ही नवी बाराखडी मोडी लिपी तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे 
खालील व्हिडिओद्वारे शिकवित आहेत 


या प्रशिक्षण मालिकेतले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा - https://www.youtube.com/user/amitsg1

Friday, July 1, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग- 4- बाराखडी ट ते ण


श्री
क ते ञ पर्यंतची बाराखडी आधीच्या दोन भागात आपण पाहिली. आता पाहू ट ते ण ही बाराखडी. यापैकी ड, ढ आणि ण या मराठी अक्षरांमध्ये आणि मोडी अक्षरांमध्ये फारसा फरक नाही. जो अगदी थोडा फरक आहे तो आपले प्रशिक्षक श्री. मंदार लवाटे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करतीलच.

ट ते ण ही बाराखडी शिकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-


या संपूर्ण प्रशिक्षणाचे व्हिडिओ पाहण्य़ासाठी या लिंकवर क्लिक करा-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

ड ते ण ही बाराखडी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक उपयोगी पडेल-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZeE5lUWo0alJNVVU/view?usp=sharing

आपणा सर्वांना नम्र विनंती. वरच्या लिंक आपापल्या फेसबुक, ट्विटर, ई-मेलवरुन जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा. अधिकाधिक लोकांनी मोडी लिपी शिकावी हीच आमची इच्छा आहे.