श्री
मोडी लिपीची क ते ज्ञ या अक्षरांची बाराखडी या ब्लाॅगद्वारे आणि युट्यूबच्या पाठांद्वारे शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मोडीची बाराखडी आतापर्यंत तुकड्यातुकड्यांमध्ये आपणाला डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहेच. संपूर्ण बाराखडी आपल्या संग्रही असावी यासाठी ही बाराखडी आता डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर दिली आहे. आपले प्रशिक्षण श्री. मंदार लवाटे यांनी पुण्याचे एक चित्रकार-कलावंत श्री. ओंकार इनामदार यांच्याकडून ही सुबक बाराखडी खास आपल्यासाठी काढून घेतली आहे. ही बाराखडी समोर ठेऊन आपल्याला मोडी अक्षरांचा सराव करता येईल.https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZQm5CQ2J0WGJPUlE/view?usp=sharing
या मोडी अक्षरांची वळणे कशी आहेत हे मंदार लवाटे युट्यूबच्या माध्यमातून शिकवत आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या आॅनलाईन प्रशिक्षण वर्गाला जरुर भेट द्या.
https://www.youtube.com/user/amitsg1
मोडी स्वर आणि मोडी लिपीतली समान दिसणारी अक्षरे याचा पाठ आम्ही युट्युबर लवकरच अपलोड करत आहोत. त्यासाठी या ब्लाॅगला आणि युट्यूबवरच्या प्रशिक्षण वर्गाला आवर्जून भेट द्या. आपल्या प्रतिक्रीयाही आम्हाला हव्या आहेत. त्याही खालील ई-मेलवर जरुर पाठवा
gamits@gmail.com
No comments:
Post a Comment