Wednesday, October 26, 2016

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री
आपणा सर्वांना दीपावलीच्या 
हार्दीक शुभेच्छा
ही दीपावली आनंदाची
सुखसमाधानाची जावो
अमित गोळवलकर

Wednesday, October 19, 2016

मोडी लिपी आणि फारसी शब्द


श्री 
मोडी लिपीतली कागदपत्रे वाचताना अनेक फारसी शब्द डोळ्यांसमोर येतात. यातले अनेक शब्द पुढे मराठी भाषेतही आले आहेत. आपण सर्रास हे शब्द आजही वापरतो. मोडी शिकताना आपल्याला अशा अनेक शब्दांचा परिचय होतो. मोडीची कागदपत्रे वाचणे हे एखादे कोडे सोडविण्यासारखे आहे. ते सोडवताना भाषेची रंजकताही आपल्याला अनुभवता येते. हेच सांगताहेत मोडी लिपी तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे.

युट्यूबच्या माध्यमातून मोडी शिकण्यासाठी भेट द्या



Monday, October 17, 2016

मोडी वाचन सरावासाठी पुस्तक

श्री
मोडी लिपीची व्यंजने आणि स्वर यांचा सराव ब्लाॅगच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या सहाय्याने आपण निश्चित करत असाल. मोडी लिपीची बाराखडी रोज किमान पाच वेळा लिहिली तर ही अक्षरे नीट लक्षात राहतात. आपल्या सरावासाठी एका पुस्तकाच्या संचाची शिफारस करीत आहेत. ही जुन्या काळची मोडी पाठ्यपुस्तके असून त्यात वाचनासाठी धडे दिले आहेत. 1 ते 5 असा पाच भागांचा हा संच असून चढत्या क्रमाने ही पुस्तके वाचावयाची आहेत. ही पाचही पुस्तके तुम्ही उत्तम वाचू शकलात तर तुम्ही पुढे मोडी निश्चित वाचू शकता.
मुंबईच्या ढवळे प्रकाशनाच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित केली गेली आहेत. पुण्यात अप्पा बळवंत चौकातील काही पुस्तकांच्या दुकानात हे संंच उपलब्ध आहेत. ही पुस्तके आॅनलाईन मागविण्यासाठी दोन लिंक्स देत आहे. तेथूनही ही पुस्तके मागविता येतील.
http://www.bookganga.com/R/4183K

http://www.sahyadribooks.org/books/modiwachanlekhanset.aspx?bid=324

ही पुस्तके आवर्जून मिळवून वाचा. म्हणजे मोडी अभ्यासाच्या आणखी एका टप्प्यावर आपण पोहोचाल.

मोडी लिपी युट्यूबच्या माध्यमातून शिकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....
https://www.youtube.com/user/amitsg1

आपल्या काही शंका असल्यास त्या विचारण्यासाठी किंवा फिडबॅकसाठी खालील ई-मेल क्रमांकांवर जरुर लिहा
अमित गोळवलकर
gamits@gmail.com

मंदार लवाटे
lawate@gmail.com

Tuesday, October 11, 2016

मोडी लिपीतले वेगळे उकार

श्री
मोडी लिपीची बाराखडी शिकत असताना व्यंजनांचे उकार आपण पाहिले. पण काही अक्षरांचे उकार हे सर्वस्वी वेगळे आहेत. मोडी वाचणे सोपे जावे म्हणून हे उकार मुद्दामहून वेगळे दिले आहेत. खालील व्हिडिओवरुन आपणाला हे उकार जाणून घेता येतील. त्यासाठी हा व्हिडिओ पहा

मोडी लिपीची माहिती आणि सुरवातीपासूनची बाराखडी शिकण्यासाठी भेट द्या
https://www.youtube.com/channel/UCBA_F-UIqMsp__bd2DLE_Tg

Monday, October 10, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 9 - बाराखडी अ ते अः

श्री

मोडी लिपीची व्यंजने आपण शिकत असाल. त्यांचा सरावही झाला असेल. बऱ्याच विलंबानंतर मोडी लिपीचे स्वर नव्या व्हिडिओद्वारे देत आहोत. मध्यंतरी काही कामामुळे स्वर शिकविण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. आता आपण श्री. मंदार लवाटे यांच्याकडून मोडी लिपीचे स्वर शिकुयात. खालील व्हिडिओवरुन आपण मोडी स्वर शिकू शकता

संपूर्ण व्यंजने आणि स्वर शिकण्यासाठी

https://www.youtube.com/channel/UCBA_F-UIqMsp__bd2DLE_Tg