Monday, October 17, 2016

मोडी वाचन सरावासाठी पुस्तक

श्री
मोडी लिपीची व्यंजने आणि स्वर यांचा सराव ब्लाॅगच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या सहाय्याने आपण निश्चित करत असाल. मोडी लिपीची बाराखडी रोज किमान पाच वेळा लिहिली तर ही अक्षरे नीट लक्षात राहतात. आपल्या सरावासाठी एका पुस्तकाच्या संचाची शिफारस करीत आहेत. ही जुन्या काळची मोडी पाठ्यपुस्तके असून त्यात वाचनासाठी धडे दिले आहेत. 1 ते 5 असा पाच भागांचा हा संच असून चढत्या क्रमाने ही पुस्तके वाचावयाची आहेत. ही पाचही पुस्तके तुम्ही उत्तम वाचू शकलात तर तुम्ही पुढे मोडी निश्चित वाचू शकता.
मुंबईच्या ढवळे प्रकाशनाच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित केली गेली आहेत. पुण्यात अप्पा बळवंत चौकातील काही पुस्तकांच्या दुकानात हे संंच उपलब्ध आहेत. ही पुस्तके आॅनलाईन मागविण्यासाठी दोन लिंक्स देत आहे. तेथूनही ही पुस्तके मागविता येतील.
http://www.bookganga.com/R/4183K

http://www.sahyadribooks.org/books/modiwachanlekhanset.aspx?bid=324

ही पुस्तके आवर्जून मिळवून वाचा. म्हणजे मोडी अभ्यासाच्या आणखी एका टप्प्यावर आपण पोहोचाल.

मोडी लिपी युट्यूबच्या माध्यमातून शिकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....
https://www.youtube.com/user/amitsg1

आपल्या काही शंका असल्यास त्या विचारण्यासाठी किंवा फिडबॅकसाठी खालील ई-मेल क्रमांकांवर जरुर लिहा
अमित गोळवलकर
gamits@gmail.com

मंदार लवाटे
lawate@gmail.com

No comments:

Post a Comment