श्री
नमस्कार,
आमच्या पहिल्या पोस्टला दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण दाखवलेला उत्साह हा आमचा उत्साह वाढवणार आहे. या ब्लाॅगद्वारे मोडी कशी शिकणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निश्चित आला असेल. पण मी आणि माझ्यासारखे अनेक जण ज्या पद्धतीने मोडी लिपी शिकले, नेमकी तीच पद्धत आम्ही इथे वापरणार आहोत.
या नंतरच्या एक-दोन पोस्टमध्ये मोडी लिपीचा इतिहास, त्याचा वापर, मोडी लेखनाचे विविध काळ, याची माहिती असेल. लगेचच आम्ही मराठी आणि मोडीची बाराखडी या ब्लाॅगवर अपडेट करु. या दोन्ही बाराखड्या डाऊनलोड करुन तुम्हाला हाताशी ठेवता येतील. या टप्प्यानंतर दृकश्राव्य (Audio Visual) स्वरुपात प्रत्यक्ष बाराखडी कशी काढावी हे दाखवले जाईल. याचे सर्वसाधारण पाच भाग असतील. ही बाराखडी कोण शिकवणार हे तूर्तास सांगत नाही. पण जे मान्यवर ही बाराखडी शिकवणार आहेत, त्यांचा या क्षेत्रातला अनुभव मोठा आहे, एवढेच आत्ता सांगतो. ज्यांना मराठी बाराखडीची ओळख, उजळणी करायची आहे, त्यांनाही याचा उपयोग निश्चित होईल.
मोडी लेखनाचा महत्त्वाचा भा्ग असलेली कालगणना आणि रेघी हिशेब याचीही सविस्तर माहिती ब्लाॅगद्वारे दिली जाईल. ती लिखित स्वरुपात आणि दृकश्राव्य स्वरुपातही असेल.
पुढे सरावासाठी काही पाठ आम्ही अपडेट करु. त्यात सरावासाठी कुठली पुस्तके वाचायची, ती कोठून मागवायची याची माहिती आणि लिंक्स आम्ही देऊ. आमचे ई-मेलही आम्ही शेअर करणार असून सरावासाठी तुम्ही केलेले लेेखन तुम्ही आम्हाला स्कॅन करुन पाठवू शकता. पुढच्या टप्प्यात ब्लाॅगच्या माध्यमातून सोपी ऐतिहासिक मोडी कागदपत्रे सरावासाठी उपलब्ध करुन दिली जातील. त्याचबरोबर काही संस्थांच्या वेब-साईटच्या लिंक्सही आम्ही देणार आहोत. या संस्थांच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला मोडी कागदपत्रे वाचायला मिळतीलच शिवाय काही ऐतिहासिक महत्त्वाची पुस्तकेही पीडीएफ (PDF) तुम्ही वाचू शकाल.
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
चला तर मग...भेटूया नव्या पोस्टसह..
ता. क. - खाली दिलेला लेखन सीमा असे लिहिलेला शिक्का हा मोडी कागदपत्रात लिखित मजकुराच्या शेवटी आढळतो. मजकुराचे किंवा पत्राचे लेखन संपल्याचे दर्शविणारा हा शिक्का आहे.

मित्रानो, कृपया या ब्लॉगची लिंक जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती आहे. आम्हाला खूप मराठी बंधवांपर्यंत पोहोचायचे आहे.
ReplyDeleteHi,
ReplyDeleteKhup chaan upakram. Looking forward for the new updates
धन्यवाद
DeleteHi,
ReplyDeleteKhup chaan upakram. Looking forward for the new updates
नमस्कार,
ReplyDeleteधन्यवाद. अशाच प्रतिसादाची गरज आहे. आपल्यासारखे अनेक मोडी लिपी किंवा मराठी प्रेमी याची वाट पहात आहेत. कृपया या लिंक जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या पुढच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.
श्री अमित जी । आपल्या अत्युत्तम उपक्रमातील पुढील लेखाची आतुरता आहे । धन्यवाद ।
ReplyDeleteFarch changla upkram ahe ha..

ReplyDelete