Saturday, June 25, 2016

मोडी लिपी प्रशिक्षण- भाग 1

श्री

मोडी लिपी शिकण्याच्या प्रक्रियेतल्या पुढच्या टप्प्यावर आपण जात आहोत. आधी सांगितल्यानुसार आता हे प्रशिक्षण कोण देणार हे स्पष्ट करतो. पुण्यातले इतिहासाचे अभ्यासक आणि मोडीचे तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे आपणास मोडी लिपी शिकवणार आहेत. श्री. लवाटे दशकाहून अधिक वर्षे मोडी लिपीचा अभ्यास करत आहेत. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात श्री. लवाटे मोडी कागदांचा अभ्यास करतात. पुण्याचा इतिहास,  पुण्याच्या गणेशोत्सवाचा इतिहास याचा श्री. लवाटे यांचा मोठा अभ्यास आहे. आता खालील व्हिडिओमध्ये आपण श्री. मंदार लवाटे यांच्याकडून मोडी लिपीची माहिती, ती शिकण्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत....
प्रशिक्षणाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- 


प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ  पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/user/amitsg1



मंदार लवाटे, मोडी तज्ज्ञ
श्री. मंदार लवाटे १९९९ पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी कागदपत्रांवर संशोधन करीत आहेत. श्री. लवाटे यांनी २००३ साली महाराष्ट्र शासनाच्या वर्गात मोडीचे शिक्षण घेतले. पुढे ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी त्यांना मोडीतील खाचाखोचा व उर्दू  शिकविले .२००८, मे  पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ी. लवाटे यांनी मोडीचे अध्यापन वर्ग सुरु केले. त्यांनी आता पर्यंत मोडी लिपीचे ३७ वर्ग(batches) घेतले आहेत. महाराष्ट्र पुराभिलेखागर पुणे ( पेशवे दफ्तर ) व भारत इतिहास संशोधक मंडळ येथील अनेक अप्रकाशित कागद त्यांनी उजेडात आणले.  दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आदी वृत्तपत्रात २००० सालापासून आजपर्यंत इतिहास, संस्कृती या विषयावरचे ४०० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. श्री. लवाटे यांनी लिहिलेली पुण्यातील गणपती मंदिर, पुणे कृष्णधवल ,पुण्यातील गणेश विसर्जन-उत्सव १२१ वर्षाचा, सोपी मोडी पत्रे ही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. श्री. लवाटे यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळून उर्वरित वेळ ते इतिहासाचे संशोधन आणि मोडी लिपीच्या प्रसाराचे कार्य करतात.

1 comment: