Saturday, June 18, 2016

मोडी का शिकायची?

वापरात नसलेल्या मोडी लिपीचा अभ्यास आज का करायचा किंवा आज ही लिपी का शिकायची असा प्रश्न कदाचित कुणाला पडेलही. पण आजच्या महाराष्ट्राच्या इतिहासाची सुुवर्णपाने याच मोडी लिपीत लिहीली आहेत हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. 12 व्या शतकापासून सुरु झालेली मोडी लिपी 1950 पर्यंत व्यवहारात होती. नंतर उरले ते मोडी दस्तऐवज. शिवशाहीतल्या आणि पेशवेकाळातल्या कागदपत्रांपैकी बहुसंख्य कागद हे याच मोडी लिपीत लिहिलेले आहेत. नाना फडणवीसांच्या काळात तर सुरेख मोडी अक्षर असलेल्यांना खास दफ्तरात नोकरी दिली जात असे. आजहीू मोडी वाचू शकणाऱ्यांना त्यातून अर्थार्जनाची संधी मिळू शकते.

आज या साऱ्या कागदपत्रांचा खजिना विविध संस्था, सरकारी कचेऱ्यांमध्ये रुमालांमध्ये बंद आहे. हा खजिना मोडी लिपी वाचू शकणाऱ्यांची प्रतिक्षा करतो आहे. मोडी लिपी का शिकायची यासाठी उदाहरणादाखल काही लिंक्स खाली देत आहे. त्या जरुर वाचाव्यात ही विनंती.
(सोमवारी याच ब्लाॅगवर मराठी बाराखडी देत आहोत. मोडी शिकण्यापूर्वी मराठी बाराखडी जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणानंतर अनेकजण बाराखडी विसरलेले असतात असा अऩुभव आहे. त्यामुळे या निमित्ताने या बाराखडीची उजळणीही होईल)

कृपया खालील लिंक्स जरुर पहा

www.esakal.com/esakal/20100517/5177515027846289957.htm

www.esakal.com/Tiny.aspx?K=W8C2K
मोडी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB

3 comments:

  1. फारच सुंदर उपक्रम । मी या उपक्रमांत सहभागी होण्यास खूप उत्सुक आहे ।

    ReplyDelete
  2. khup chaan!! mee aaple video baghitle! kahi documents ani tyanche devnagrit bhashantar pan blogwar takal ka please!

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की टाकणार आहे. कृपया युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

      Delete